Patient Info

Effect on my Life: Quality of my life has improved tremendously. Now I am working as visiting faculty for different engineering collages without any complex & with high level of confidence. This helps me earning & keeps me busy, even after I am able to eat, practically, everything which I could not had ever before. Every meal I take, it reminds me Dr, Joshi.Once again I am very much thankful to you for giving me new life.

Mr. Ajit Deshpande

माझा समोरचा दात पिवळा झाला होता. तसेच डाव्या बाजूचा कडेचा दात पडला होता. आणि सलग ४/५ तास बोल्यावर माझा जबडा प्रचंड दुखायचा. ह्या तीन त्रासांमुळे मला नृत्य शिकवणे आणि सादरीकरण करणे यात अडचणी येत होत्या. माझ्या वाव्साया मध्ये चेहर्या वरील हावभाव आणि स्माईल ह्या गोष्टींना खूप महत्व असते. त्या मुले माझ्या प्रोफेशन चा अस्थेतिक सीन लक्षात घेऊन डॉ. संजय जोशी आणि डॉ. प्रथमेश जोशी यांनी अतिशय काळजी पूर्वक ट्रीटमेंट केली. समोरचा दात क्लीन केला तेव्हा माझ्या मनात खुप भीती होती कि स्टेज वरून लाईट मध्ये तो दात जास्तच चमकणार नाही न, पण तसे काही हि झाले नाही आणि ब्लीच केलेल्या दाताची शेड पण १००% match झाली. आता माझे ट्रीटमेंट केलेले दात ओळखून हि येत नाहीत. स्टेज वरून कोणत्या हि angle ने वावरताना काळजी नसते. केवळ तीन महिन्यातच माझे पूर्ण दुख्णे थांबले. आता मी चिक्की, खाकरा, रोटी हे चाऊन खावे लागणारे पदार्थ नाघाबार्ता खाते. आता मला कोणत्या हि प्रकारचा त्रास जाणवत नाही. डॉ. प्रतामेश जोशी यांचे स्लोगन आहे “we create smiles….” पण माझ्या अनुभवावरून मला वाटते कि “we create confident smiles….” हे सुयोग्य आहे.

सौ. श्रुती पंडित
(Dance teacher, performer and choregrapher)

काही दिवसांपासून माझे पुढचे दोन दात दुखत होते व हलत ही होते. तेव्हा मला माझ्या भावाने डॉ.प्रथमेश जोशी सरांचे नाव सुचवले. तेव्हा पहिल्या भेटीतच सरांनी मला काय प्रोब्लेम आहे तो व्यवस्थितपणे समजावून सांगितला व माझ्या मनावरचे दडपण कमी केले. माझे एकूण पुढचे दोन दात हलत होते. त्यापैकी त्यांनी मधला दात काढून बाकीचे दोन दात वाचविले व मला माझाच काढलेला दात पुन्हा बसवून दिला. ही कन्सेप्ट माझ्या साठी अतिशय नवीन होती पण ती सरांनी अतिशय कौशल्यानी अंड उत्कृष्टपणे करून दाखवली. माझ्या सर्व ट्रीटमेंट १ ते दीड महिन्यात पूर्ण करून दिली. व त्या एकही ट्रीटमेंट मध्ये मध्ये मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. क्लिनिक चे वातावरण अतिशय खेळीमेळी चे आहे. व सरांचा स्टाफ पण खूप चांगला आहे. डॉक्टरांचे वागणे अतिशय नम्र आहे. एकंदरीत सरांबरोबर आलेला अनुभव अतिशय उत्तम होता.

सौ. माधुरी गुजराथी

मी आपल्या क्लिनिक मध्ये दाताच्या treatment साठी यायला लागले त्याला साधारण पंचवीस वर्षे झाली असतील. मनात येणारे विचार आपल्याशी प्रत्यक्ष बोलेन असा वाटत नाही, पण लिहून मात्र व्यक्त करू इच्छिते. आपली treatment हि अतिशय perfect असते. म्हणून मी तुम्हाला perfectionist म्हणते. आपण कामात जेवढे कुशल आहात तितकेच 'माणूस' म्हणून खूप मोठे आहात. तुमच्या विषयात तुम्ही नैपुण्य प्राप्त केले असले तरी सर्वोच्च शक्तीवर म्हणजे देवावर तुमची अढळ श्रद्धा आहे. हल्लीच्या वैज्ञानिक जगतात असे फार कमी लोक दिसून येतात. एवढे विचार मांडायचे होते किंवा असे म्हणता येईल कि इतकेच शब्द व्यक्त करू शकते. आपल्याला दीर्घायुष्य, यश, आरोग्य, कीर्ती लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपल्या कुटुंबातील सर्वांना माझा नमस्कार. तसेच नव्याने practice सुरु करणारे आपले सुपुत्र डॉ. प्रथमेश यांनाही सुयश चिंतते.

अश्विनी केतकर
creative dental testimonial
Dentist in Kasba Peth

We, at Creative Dental Clinic, provide you & your family with holistic and evidence-based dental treatment whilst ensuring the highest levels of quality, comfort, and hygiene, making your visits enjoyable.